Friday, June 8, 2018

गोट्या गोट्या

ad300
Advertisement

गोट्या गोट्या


               गोट्या गोट्या हा शब्द एकूण नक्कीच तुमच्या गालावर थोड़ हसु आलं असेल कारण तो शब्द एकूण खुप आठवणी तुमच्या डोळ्यासमोरून गेल्या असतीलमी माझा सांगते आम्ही माझ्या बालपणीच शहरात आलो पण माझ्या शहरापेक्षा गावकडेच खुप मैत्रीणी होत्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की माझे  विचारचक्र सुरु व्हायचे अभ्यासाचे नाही ..😝..  मामाच्या  गावाला जायचे, तसं  माझा आधीच प्लानिंग झालेलं असायचं की परीक्षा संपली की त्याच दिवशी संध्याकाळी नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळीच गावाकडे निघायचेसाधारण  -  तास लागतात रेल्वेने जायला आणि तिथुन पुढे बसने पाऊण तास असा जवळपास तासांचा हा प्रवास . संध्याकाळी वाजेपरेंन्त मी मामाच्या गावी असायचे, मावशी, मावशीचे मुलं, मामा, मामांची मुलं असे सगळे जमायचो. मग थोड्या वेळाने कोण कोण गावी आलेला आहे त्याचा तपास सुरु व्हायचा म्हणजे - मुलींचा ग्रुप होता आमचा गावाकडे त्यातल्या - जणी गावातल्याच होत्या आणि - जणी आम्ही बाहेरगावच्या.

              आता दुसरा दिवस एकदम आरामात सुरु व्हायचा उशिरा उठायचं, उशिरा अंघोळ आणि सगळं झालं की मग अंगणात बघायचं की कोण कोण खेळायला जमलं आहे आणि आवाज देऊन सगळ्यांना एकत्र करायचं. आता आम्हा मुलींचे खेळ ठरलेले असायचे लंगड़ी पळकी, विष-अमृत, नदी की पहाड़, लगोरी, लपाछपी, जोडीची-शिवाशिवी,खो-खो,बित्तु-बित्तु आणि मुलांचे मोजून - खेळ असायचे क्रिकेट, गोट्या गोट्या, विटी-दांडू. मुलांच्या खेळामधल्या  गोट्या गोट्या या खेळाचे मला आणि माझ्या - मैत्रिणींना खुप आकर्षण होते. मुलींचे खेळ खेळून झाले की आम्ही मुलांच्या त्या खेळाचे निरिक्षण करायचो की कसं खेळतात काय नियम आहेत. हे सगळं झालं की मग विचार सुरु व्हायचा की ह्या गोट्या आणायच्या कुठून, ह्या गोट्या  विकत पण भेटतात हे माहित झाला  मग काय प्रत्येकीने - रुपयांच्या गोट्या आणायच्या हे ठरलं.

             त्यावेळी सारवलेलं आंगन असायचं  मग गोट्या गोट्या खेळण्यासाठी एक वर्तुळाकार रिंगन आखलेलं असायचं आणि ठराविक अंतरावर उभं राहून  एका गोटीने त्या रिंगणातल्या सांगितलेल्या गोटीला नेम मारून रिंगनाबाहेर काढायचं, आता नेम मारतना मुलांचे  अहिराणीतले शब्द पण एकदम वेगळेच असायचे उदाहरणार्थ हाई वरली रे( म्हणजे रिंगणातली वरची गोटी ), हाई खालणी रे (म्हणजे रिंगणातली खालची गोटीआता एखादी गोटी थोड़ी पिवळसर असायची मग म्हणायचे हाई पीव्वी रे असं खुप मज़ा यायची हे असे शब्द एकूण.




              आम्ही मुली पण तसं खेळायचो, आता खेळ म्हटला म्हणजे जिंकण-हारणं  येणारच गोटीला नेम लागला तर टी गोटी नेम मारणाऱ्याची व्हायची. एक दिवस असचं झाला मी हळू हळू माझ्या जवळच्या सगळ्या गोट्या हारली आणि आता मला परत पैसे पण भेटणार नाही ते पण गोट्या विकत घ्यायला तर मुळीच नाही , मग एक दिवस असचं खेळता गेला थोड़ वाईट तर वाटतच होत की मी सगळ्या गोट्या हारली  होती आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला की मावशीचा मुलगा पण हा खेळ खेळतो आणि त्याला गोट्या गोट्या हा खेळ चांगल्याप्रकारे खेळता येत असल्यामुळे त्याच्याकड़े खुप गोट्या होत्या मग पटकण पळतच घरी गेली आणि त्याला म्हटली की मला - गोट्या उधार दे मी तुला लवकरच परत करेल आधी तो नाही म्हटला मग थोडया विनवण्या केल्या त्याच्या शेवटी त्याने गोट्या दिल्यागोट्या उधार म्हटल्यावर त्या परत कराव्या लागणारच होत्या म्हणून खेळ पण खुप सांभाळून खेळावा लागणार हे समजत होते. खेळायच्या ठिकाणी गोट्या पासून सुरवात केली आधी भावाच्या दोन गोट्या नीट नेम धरुन जिंकली आता पुढच्या गोट्यांचा नेम बरोबर लागला तर त्या माझ्या होणार होत्या आणि रिंगणतल्या गोट्या मी जिंकली , गोट्या ठरल्याप्रमाणे भावला परत केल्या आणि उरलेल्या गोट्या माझ्या गोट्या घेऊन मी परत खेळायला निघाली.





            या गावाकडच्या खेळात एक वेगळीच मज़ा होती, शहराकडे गोट्या गोट्या हा खेळ कोणी खेळत नसायचेम्हणून गावाकडे गेली की शहरी खेळ खेळायचे सोडून गावाकडचे खेळ खेळायचो. आता तर गोट्या गोट्या हा खेळ खुप जणांना माहीत  पण नसतो. तुम्ही हा खेळ खेळले असणार तर तुम्हाला पण नक्कीच हा खेळ खेळल्याचे जुने दिवस आठवतील आणि खेळले नसणार तर या लेखामधून तरी तुम्हाला गोट्या गोट्या हा खेळ थोड़ा तरी  माहीत झाला असेल. चला आज साठी इतकेच पुन्हा भेटु पुढच्या लेख मधे एक वेगळी आठवण घेऊन.


Share This
Previous Post
Next Post

0 comments: