![]() |
Advertisement |
सुरवात मनमोकळ्या गप्पांची
मी एक साधारण मराठी मुलगी ..हा ब्लॉग मी मनमोकळ्या गप्पा करण्यासाठी सुरु केला आहे ,
अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवून ठेवल्या जातात आणि काही कायमच्या मनातच राहून जातात आणि जन्मभर बोचतात. चला तर मग करुया गप्पा ...😉... माझ्या लिखणातूनच आपण भेटु.
कसं आहे ना आजकाल सगळेच जण खुप व्यस्त झाले आहेत...कोणाकडेच पुरेसा वेळ नाही आहे मनातलं बोलण्यासाठी किंवा काही जुन्या आठवणी आठवण्यासाठी. आधी हे मोबाइल, लैपटॉप यांचा फार वापर होत नव्हता म्हणून घरातील नातेवाईकाना, मित्र, मैत्रीनिंना भेटनं होत असायच पण आता घरी बसल्याच मोबाइल ने एकमेकांशि बोलनं होत असतं, म्हणून आधी थोड फार भेटना व्हायच ते देखिल कमी झालं...
लेख : सुट्टीत केलेली मज्जा
|
खरंच किती छान होत्या जुन्या आठवणी, जुने दिवस. आता ते दिवस आठवले की वाटतं की आता तसं काहीच राहीलं नाही. आजकालची मुलं खेळायला पण बाहेर जात नाही. आमच्या वेळेस तर आम्ही जो परेंत घरातून बोलवनं येत नाही तितका वेळ खेळत असायचोआणि घरी जाता जाता एकमेकांना सांगायचो की जेवण झालं की या खेळायला परत, खरंच खुप मज्जा केलीय आधी आणि मार पण तितकाच खाल्ला आहे.
कदाचित तुम्ही देखिल अशीच मज्जा तुमच्या बालपणी केली असेल. तुम्ही पन खोड़या काढ़ल्या असतील. चला तर मग आठवण काढूया बालपणीतील सगळ्या गोष्टींची आणि करूया मनमोकळ्या गप्पा. हा माझा पहिलाच लेख आहे, मला काही एकदम पुस्तकाप्रमाणे लेख लिहायला जमत नाही म्हणून इथे मी आपण रोज जसे बोलतो तसेच बोलणार आहे. बरं आजसाठी इतकेच पुन्हा भेटु पुढच्या लेख मधे.
0 comments: