![]() |
Advertisement |
दुपारची
भटकंती
आता
दुपार म्हटली की
मनात विचार येतो
तो दुपारच्या थोड्याश्या
झोपेचा आणि जे
कामावर जातात त्यांची दुपार
कामातच असते पण
लहानपणीची दुपार आठवुन बघा
जरा , काय करायचो
लहानपणी आपण..म्हणजे
तसे प्रत्येकाचे अनुभव
वेगवेगळे असतील मी माझा
अनुभव सांगते
माझी
शाळा सकाळचीच ,सकाळी
७ ते १२.
आता शाळा सकाळची
म्हणजे सकाळी लवकर उठाव
लागयचं, एकतर ती
साखर झोपेची वेळ
असायची म्हणुन सकाळी उठायची
खुप जीवावर यायची
पण पर्याय नव्हता.
एकदचे का शाळेत
गेली की मग
आई तिचे काम
आवरायला घ्यायची माझी शाळा
सुटेपरेंत तिचं सगळं
आवरुणव्हायचं फक्त
जेवण बाकी असायचे.
११:४५ झाले
की ती मला
घेण्यासाठी शाळेत यायला निघायची
१२ वाजता माझी
शाळा सुटली की
आम्ही गप्पा करतच
घरी यायचो. आज
शाळेत काय शिकवलं,
आज शाळेत कोणासोबत
काय बोललि , डबा
संपवला की नाही
, कोणती मुलगी कोणासोबत भांडली
असं सगळंकाही सांगता
सांगता घर यायचं.
घरी आली की
मग दोघे मस्त
जेवण करायचो आणि
खरी मजा सुरु
व्हायची ती जेवण
झाल्यावर. जेवण झालं
कीतीची इच्छा असायची की
मी दुपारी निदान
थोडा वेळ तरी
झोपावं आणि मग
ती पण सकाळपासून
काम करुन थाकलेली
असायची मग तिलाही
थोड्या विश्रांतीची गरज असायची
म्हणुण मग जेवण
झालं की ती
मला थोड़ा वेळ
झोपायला सांगायची.
आता माझ्यासाठी सकाळच्या आणि
दुपारच्या झोपेत खुप फरक असायचा
सकाळी मला झोपयचं
असयचं आणि दुपारी
मला झोपायची इच्छा
नसयची आईलाकितीपण समजवलं
तरी ति एकूण
नाही घ्यायची जबरदस्तीने
का असेना पण
ती झोपायला लावायची.
खरं तर मला दुपारी
पण खेळायचं असायचं
म्हणुन मला दुपारी
अजिबात झोप यायची
नाही फक्त पडून
असायची मी आणि
संध्याकाळच्या खेळायचा विचार करत
बसायची आणि
विचार करता करताच
मी जबरदस्तीने का
असेना पण झोपयची
.मग दुपारी झोपेतुन
उठली की आई
चहा करायची आणि
मी पटापट गृहपाठ करत बसायची
कारण खेळायला पण तेव्हाच जायलाभेटायचं जेव्हा माझा गृहपाठ झालेला असेल. गृहपाठ झाला की मी लगेच खेळायला पळायची. पण दुपारच्या झोपेचा खुप कंटाळा येत असल्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. २ ३ दिवस विचार केला आणि मार्ग सापडला थोड़ा कठीन होता पण झोपेपासून सुटका होणार होती म्हणुन जास्त पुढचा मागचा विचार काही केला नाही.
आजच्या दिवशी
मी ठरल्या प्रमाणे
मी करणार होती,
दुपारचे जेवण झाले
आणि मग आई
ने झोपयल सांगितले
मी पन काही
न बोलताच तैयार
झाली मग दोघे
पण खाली झोपलो
थोडया वेळात आईचा
डोळा लागला मग
मी हळूच उठली
आणि आवाज न
करता दरवाजा उघडला
आणि बाहेर खेळायला
निघाली .आईच्याउठण्याच्या वेळेस मी घरी
पोचली आणि परत
झोपायच्या जागेवर जाउन झोपली
,आईला संशय नको
यावा म्हणून डोळे
हाताने चोळुन थोड़े लाल
करुण घेतले. मी
वाट बघत होती
की आईला मला
काही बोलते की
काय हीला समजलं
की नाही पण
ती काहीच बोलली
नाही म्हणजे चला
माझा प्लान यशश्वी
झाला होता.
मग
काय रोज तेच
करायचं ठरलं असे
७-८ दिवस
चालले आणि एक
दिवस माझे भांडे
फुटले झाले असे की मी रोजचं ठरल्या
प्रमाणे निघाली पण त्या
दिवशी आई झोपलेली
नव्हती ती झोपयचं
नाटक करत होती कारण
मी रोज दुपारी
काही न बोलताच
झोपत होती आणि तिला हे माझं
वागण जरा विचित्र
वाटलं म्हणुन ती
त्या दिवशी झोपयचं
नाटक करुण पडलेली
होती मी पण
ती झोपलीय अस
समजून निघुन गेली
आणि मग ती
पण माझ्या मागे
आली मी काय
करते ते बघायला.
मग काय तेव्हा
तर ती काहीच
नाही बोलली मी
पण मस्त आई
च्या उठण्या अगोदर
घरी पोहोचली पण
ती जागे होती
तीला जागे बघून
1क्षण मी पार
घाबरुणगेली मि हळूच
घरात गेली आई
चिडलेली तर होतीच
म्हणुन तिने थोड़ा
रागवलंच पण नंतर
तिने मला समजावून सांगितले आणि मल
माझी चुक लक्षात
आणून दिली मी पण तीची माफी
मागितली आणि पुढे
अस करणार नाही
अस सांगितलं , तिच्या
अस प्रेमळ वागण्यामुळेच पुन्हा तिच्या विरोधात मी कधीच जायची नाही. दुपारी न झोपण्यासाठी अश्याच अनेक क्लुप्त्या तुम्ही देखील लढवल्या असतील...चला आज साठी इतकेच पुन्हा भेटु पुढच्या लेख मधे एक वेगळ्या आठवणी सोबत..
0 comments: