नमस्कार...
मनाचा कप्पा या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. मी एक साधारण मराठी मुलगी एका छोट्या शहरातली मला फिरायला , आठवणी जपायला आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला आवडतो , आनंदी राहण्यासाठी काहीतरी मोठेच घडले पाहिजे असे मला मुळीच वाटत नाही . मला तस जास्त लिहिता वैगरे येत नाही पण आपल्या बोलीभाषेत लिहण्यात देखील एक वेगळाच आनंदच आहे ..हा ब्लॉग मी मनमोकळ्या गप्पा करण्यासाठी सुरु केला आहे . हा ब्लॉग सुरु करण्यामागचे कारण असे की मी असचं एक दिवस माझ्या बालपणींच्या आठवणीत रमली पण त्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माझ्या बालपणीच्या काही आठवणी धूसर होत चालल्या होत्या आणि मला माझ्या या अप्रतिम आठवणी विसरायच्या नव्हत्या म्हणूनच या ब्लॉग द्वारे का असेना माझ्या काही आठवणी तर स्मरणात राहतील . या ब्लॉग वर फक्त बालपणीच्या नाही तर आयुष्यात आवडलेल्या आणि कधी न विसरता येणाऱ्या आठवणी असणार आहेत , तुमच्या जीवनात पण असे क्षण नक्कीच असतील या ब्लॉग मधून तुम्हाला थोड़े का असेना पण ते क्षण तुमच्या डोळ्यासमोरून तरळतील तरी . तुमच्या आयुष्यातील क्षण देखील तुम्ही येथे message द्वारे सांगु शकता किंवा मला मेल (manachakappaa@gmail.com) करू शकता म्हणजे या ब्लॉग द्वारे मी तुमची आठवण प्रकाशित करेल आणि आपले बाकीचे वाचक तुमच्या आठवणीतून त्यांच्या आठवणीत रमतील .
0 comments: