गुलाबाई
तुमच्यातल्या किती जणांना माहितीय गुलाबाई - गुलोजी बद्दल, कदाचित खूप कमी . आजचा लेख त्यावरच आहे नसले महिती तरी हा लेख वाचून तुम्हला पुसटशी कल्पना येईलच.
आधी या उत्सवा बद्दल सांगते , खान्देशात ‘गुलोजी-गुलाबाई’ या ग्रामदैवतांची श्रद्धेय मनाने पूजा केली जाते. शिव-पार्वतीची उपासना म्हणजे शक्तीची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून अहिराणीच्या लोकमानसात रुजली आहे . गुलाबाई-गुलोजी हा कुमारिका किंवा सोळा वर्षांच्या आतील मुलींनी खेळण्याचा, मनोरंजनाचा उत्सव आहे. हा उत्सव व्रतासारखा बंदिस्त विधीयुक्त चौकटीत जखडलेला नसतो. हा कुमारिकांचा लोकोत्सव आहे.
खान्देशात ब्राह्मणांपासून आदिवासींपर्यंत सर्व जातीजमातींच्या मुली गुलाबाईची आनंदाने मांडणी करून पूजा करतात. सायंकाळी या गावातल्या मुलींनी एकत्र जमायचे व घरोघरी जाऊन गुलाबाईची पूजा, गाणी, आरत्या, रांगोळ्या, खाऊ असा कार्यक्रम महिनाभर नित्याने असतो.
आता माझ्या या उत्सवाबद्द्ल ची आठवन सांगते, मी लहान असताना गावाकडे राहायची तर तिथं आम्ही सगळे गुलाबाई-गुलोजी बसवायचो. मस्त सजावट वैगरे असायची सुंदर आखीव रेखीव अशी गुलाबाई गुलोजी आणि मांडीवर बाळ ची मूर्ती आनायचो गावात जाऊन आणि जमलंच तर टिपरी पण घेऊन यायचो नाचण्यासाठी .
माझी बहिण आणि मी मिळून आमच्या घरी गुलाबाई गुलोजी बसवायचो आणि आमच्या 7 8 मैत्रिणी अशी सगळी 7 8 घर ठरलेली. संध्याकाळ झाली की आम्ही भेटायचो आणि मग एक एकेकाच्या घरी जायचो गाणे म्हणायला आणि नाचायला. आता माझा आवडता पार्ट नाच गाणी झाल्यावर प्रत्येकीच्या घरी गुलाबाई गुलोजी साठी खाऊ असायचा त्यात मज्जा अशी होती की जिच्या घरी जायचो ती मुलगी खाऊ एक वाटीत किंवा डब्यात झाकून तो डबा हलवायची आणि बाकीच्यांनी खाऊ ओळखायचा खूप मज्जा यायची सगळयांचे तर्क वितर्क बघून. तस काही रेस नसायची की खाऊ ओळलाखलाच गेला हवा एक गमतीचा भाग म्हणून आम्ही तसं खेळ खेळायचो. मला तर जाम मज्जा यायची प्रत्येकीकडे वेगळा खाऊ पण असायचा आणि खळखळून हसणं नाच गाणं पण व्हयचा. खाऊ ओळखायला आणि खायलाच खूप मज्जा यायची मला त्यासाठीच जायची मी . म्हणजे रोज वाट बघायची संध्याकाळची की केव्हा आम्ही सगळे भेटू ,खेळू , आज कोणता खाऊ ठेवायचा ओळलाखायला , टिपरी घेऊन जायची की नाही नाचायला की असंच नाचणार आहे सगळे दिवसभर त्याच विचारात असायची. या सगळ्यात दिवस कुठे उगवायचा आणि कुठे संपायचा समजायचं पण नाही.
पुढे आम्ही शहाराहत राहायला आलो बाबांची बदली झाली होती. शहरात कुणाकडे अस गुलाबाई गुलोजी जास्त बसवत नव्हते सुरवातीला मला थोडा जड च गेला सगळं काही एकटीच गुलाबाई बसायवायची एकटं गाणे म्हणायची ,आईच असायची ती मग खाऊ आणायची रोज वेगळे मी एकटी ओळखायची आणि अस करत करत पुढे मग हे सगळं हळू हळू शहरात बंदच होत गेला. आता राहिली ती फक्त आठवण.
अशी ही गुलाबाई गुलोजी ची माझी लहानपणी ची एक सुंदर आठवण . वरचा लेख वाचून तुम्हाला थोडी फार कल्पना आली असेलच, चला भेटू पुढच्या लेख मध्ये अशीच एक वेगळी आठवण घेऊन .